शेतीला सर्वात मोठा उपद्रव उंदीर आणि उंदीरवर्गीय प्राण्यांपासून म्हणजेच रोडंट्सपासून होतो – विशेषतः पावसाळ्यानंतर. उंदीरवर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शेतक-यांनी आतापर्यंत करून पाहिलेले उपाय शेतकरी बहुधा उंदीर मारण्याचे औषध आणि थोडे पीठ एका प्लास्टिकच्या आवरणात एकत्र मिसळून झाडांच्या शेंड्यांवर ठेवतात. ते खाऊन उंदीर मरतात व खाली पडतात. परंतु पावसाळ्यात ह्या विषप्रयोगाचा काहीही उपयोग होत नाही. शेतकरी भाजलेले दाण्यांचे कूट, तीळ, धने आणि उंदीर मारण्याचे औषध एकत्र करून झाडांच्या शेंड्यांवर ठेवतात. परंतु ही पद्धत उंदरांप्रमाणेच पक्ष्यांचाही बळी घेऊ लागल्याने ती घातक ठरू लागली. शेतकरी व्यावसायिक उंदीरमा-यांना बोलावतात परंतु असे लोक एक उंदीर पकडण्यासाठी २५ ते ३० रूपये घेत असल्याने ही पद्धतही परवडत नाही. नवीन पिंज-याविषयी थोडेसे कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातले श्री. अरूण कुमार ह्यांनी एक पर्यावरणपूरक पिंजरा बनवला आहे. ह्या पिंज-याची तार (बाइंडिंग वायर) बांबूच्या एका जुन्या टोपलीच्या चारही टोकांना बांधलेली असते आणि तिचे दुसरे टोक एका प्लास्टिकच्या धाग्याला बांधलेले असते. प्लास्टिकचा हा दोरा नारळाच्या एका झावळीला जोडलेला असतो. ही झावळी वरखाली करता येते. बांबूच्या ह्या टोपलीत एक मिटणारा पिंजरा ठेवून त्याला खोब-याचा एक तुकडा जोडतात.उंदीर खोब-याचा हा तुकडा खायला येतात आणि पिंज-यात सापडून मरतात. मेलेले उंदीर बाहेर काढून जमिनीत पुरले जातात. ह्या रीतीने ३-४ उंदीर मारता येतात.अर्थात हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हे कारण मेलेल्या उंदरांच्या शरीरातून काही विशिष्ट गंध (फेरोमॉन) सोडले जातात ज्यामुळे इतर उंदरांना सावधानतेचा इशारा मिळून ते तिकडे फिरकत नाहीत.श्री. कुमार ह्यांनी बनवलेल्या पिंज-याची किंमत सुमारे.३०-३५ रूपये आहे. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा श्री. एस आर अरुणकुमार शेट्टिकेरे, चिक्कनैकनहाळि,जिल्हा तुमकूर - 572226,दूरभाष: 08133 – 269564, मोबाइल: 09900824420स्रोत - द हिंदू