जीवनदायी वृक्ष वड, उंबर, पाखर, नांद्रूक, पिंपळ देवालये, मंदिराभोवती लावण्यास योग्य झाडे वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडूनिंब, कांचन रस्त्याच्या कडेला लावण्यास योग्य झाडे कडूनिंब, सप्तपर्णी, करंज, वरवंटा (सॉसेज ट्री), जारुळ, अमलतास, वड, उंबर, पाखर, नांद्रूक, पिंपळ, चिंच, शिसव, शिरीष उद्यानात लावण्यास योग्य झाडे पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा), जारूळ, चाफा, रक्तचंदन, सिल्वर ओक, आंबा, कुसुंब, सप्तपर्णी, बदाम, सीता अशोक, कदंब जलदगतीने वाढणारी झाडे बकाणा, भेंडी, पांगारा, आकाशनिंब (बुच), महारुख, शाल्मली (सावर), कदंब फळझाडे बोर, चिंच, आवळा, मोहा, टेंभुर्णी, खिरणी, शिवण, जांभूळ, नारळ, शिंदी, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ, फणस, लिंबू, पेरू, चारोळी, आंबा शेताच्या बांधावर उपयुक्त झाडे खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कढीलिंब शेताच्या कुंपणासाठी सागरगोटा, चिल्हार, शिकेकाई, हिंगणी (हिंगण बेट), घायपात, जेट्रोफा (वन एरंड) सरपणासाठी उपयुक्त झाडे देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावडा, बांबू, सुरु औषधी झाडे हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडूनिंब, करंज, रिठा, निरगुडी, शिवन, टेंटू. वनशेतीसाठी उपयुक्त आवळा, अंजीर,फणस, चिंच, खिरणी, खजुरिया शिंदी, तुती, करवंद शेत जमिनीची सुपीकता वाढविणारी झाडे उंबर, करंज, ग्लिरिसिडीया, शेवरी घराभोवती लावण्यास उपयुक्त रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब कालव्याच्या काठाने लावण्यास उपयुक्त वाळूंज (विलो), ताडफळ बारा तासापेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी झाडे वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, कडूनिंब, कदंब औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारण करण्यासाठी पिंपळ, पेल्टोफोरम, पुत्रजीवी, उंबर, अशोक (उंच व पसरणारा) शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, अमलतास, पेरू, बोर, कडूनिंब, आवळा, चिंच, कदंब, बेल धुलीकण व विषारी वायूपासून निवारण सर्व जीवनदायी वृक्ष, आंबा, अशोक, बकुळ, रेन ट्री (वर्षा वृक्ष), जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तूळस हवामान स्वच्छ ठेवणारी झाडे सर्व जीवनदायी वृक्ष, थुजा, पळस, सावर (शाल्मली), कदंब, गुलमोहर, अमलतास हवेतील प्रदूषण दर्शवणारी झाडे हळद, पळस, चारोळी. हवेतील प्रदूषण मर्यादेपलीकडे गेल्यास वरील झाडांची पाने, फुले, साल, फळे यात विकृती निर्माण होते. रस्त्याच्या मधील भागात लावण्यास उपयुक्त झाडे कोरफड, शेर, रुई, जेट्रोफा, अश्वगंधा, निवडुंगाचे प्रकार ही झाडे वाहनामधून निर्माण होणारे वायूशोषण करून परिसर स्वच्छ ठेवतात. लेखक: मारुती चितमपल्ली