साबण वनस्पति (सोप प्लँट्स). ज्या अनेक ओषधी, क्षुप (झुडपे) व वृक्ष या निरनिराळ्या गटात असून त्यात सॅपोनिने ही विषारी ग्लुकोसाइडे वा तत्सम पदार्थ असतात, अशा वनस्पतींना साबण वनस्पती म्हणतात. त्यांच्या विशिष्ट भागांपासून पाण्यात भरपूर फेस होतो आणि त्यांचा उपयोग कपडे, दागिने धुण्यासाठी; झिलईकरिता व औषधांतही होतो. या वनस्पतींसंबंधीचा तपशील पुढील तक्त्यात दिलेला आहे. वनस्पतीचे नाव फेस निर्माण करणारा भाग वनस्पती आढळण्याचे स्थल सोपबार्क (क्विलाजा सॅपोनॅरिया) सुकी अंतर्साल पेरू व चिली (अँडीज पर्वताच्या प. उतरणीवर). सोपवर्ट क्वा बौन्सिंग बेट (सॅपोनॅरिया ऑफसिनॅलिस) पाने व मुळे यूरोप, प. आशिया, उ. अमेरिका व ग्रेट ब्रिटन. काऊ हर्ब (सॅपोनॅरिया वॅकॅरिया) ⇨ रिठा (सॅपिंडस लॉरिफोलियस) त्याच्या प्रजातीतील इतर काही जाती मुळे व फळे – जिप्सोफिला प्रजातीतील जाती मुळे पू. भूमध्य सामुद्रिक प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारत. सेनेगा रूट (पॉलिगॅला सेनेगा) मुळे उ. अमेरिका. अमोले (अगेव्ह हेटेराकँथा) मुळे नैर्ऋत्य अमेरिका. अगर कॅलिफोर्नियन सोपरूट (क्लोरोगॅलम पोमोरिडियानम) कंद नैर्ऋत्य अमेरिका. झिगॅडेनुस व सँड लिली (ल्युकोक्रिनम माँटॅनम) – प. अमेरिका. लेखक: ज. वि. जमदाडे स्त्रोत: मराठी विश्वकोश