कवला (कौला; लॅ. सिट्रिस क्रेनॅटफोलिया; कुल-रूटेसी). हा एक संत्र्याचा कनिष्ठ प्रकार असून तो फक्त उत्तर प्रदेश व आसाममध्ये आढळतो. या झाडाच्या फांद्या आणि पाने खाली वाकलेली असतात. झाडाचा रंग पांढुरका असतो. फळ मोठे, साल सुरकुतलेली, मगज (गर) पिवळट व चवीने आंबट असून निकृष्ट दर्जाचा असतो. फळात बिया फार असतात. फळाच्या वरच्या बाजूला देठाच्या जागेखाली गोलाकार उठावदार रेषेसारखा भाग असतो. हवामान, जमीन,मशागतइ.संत्र्याप्रमाणे. लेखक: म. वा. ठोंबरे ह. चिं. पाटील स्त्रोत: मराठी विश्वकोश