(कुल-जेन्शिएनेसी). सु. १०–२२ सेंमी. उंचीच्या या लहान पण आकर्षक व वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधीचा प्रसार भारतात पश्चिम द्वीपकल्पात, सामान्यत: गवताळ रानात सर्वत्र आहे. खोड चौकोनी; पाने साधी, लहान, समोरासमोर, पातळ, खालची रेषाकृती व वरची भाल्यासारखी, बिनदेठाची; फुले निळसर, जांभळट, लहान व शोभादायक असून विरळ वल्लरीत ऑगस्ट-डिसेंबरमध्ये येतात. संदले चार, पातळ व सपक्ष; प्रदले चार, खाली जुळलेली, वर पसरट व गोलसर; केसरदले चार; परागकोश पिवळे व टोकाशी तडकून परागकण बाहेर येतात [फूल]; बोंड तडकून दोन शकले होतात व अनेक बारीक बिया बाहेर पडतात. बागेत लावण्यास चांगली.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश