(चंपेर; क. हण-संपिगे; लॅ. फ्लॅकोर्टिया माँटॅना; कुल-फ्लॅकोर्टिएसी). या मध्यम आकाराच्या काटेरी वृक्षाचा प्रसार कोकण, प. घाट व कारवार येथील सदापर्णी जंगलात आहे. साल पातळ, करडी व गुळगुळीत; फुलांच्या फांद्या बिनकाटेरी व लवदार; पाने साधी, मोठी, अंडाकृती किंवा लांबट, दातेरी, चिवट, गुळगुळीत, वर चकचकीत पण खाली केसाळ. स्त्री-व पुं-पुष्पे भिन्न झाडांवरच्या दाट लवदार मंजऱ्यांवर जानेवारी-फेब्रुवारीत येतात. फुलांना पाकळ्या नसतात. फळ अश्मगर्भी (बाठा असलेली), शेंदरी व बोराएवढे; बिया अनेक. याच्या लाकडाला चमक असून ते बळकट पण दुर्गंधी असते. कारवारात घरबांधणीकरिता वापरतात. पूर्ण पिकलेले फळ आंबट व खाद्य असते; त्याची जेली करतात.

लेखक : ज.वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश