सस्तन प्राणी : हे पृथ्वीवर बहुतांश ठिकाणी सापडतात. यातले काही आपल्या आजूबाजूलाच वावरणारे, आपल्या नियमित परिचयाचे आहेत. माणूस सुद्धा याच गटाचा एक भाग आहे. समुद्रात आढळणारा अवाढव्य व्हेल मासा आणि हवेत उडणारे वटवाघूळही याच गटात मोडतात. मग या प्राण्यांच्या अशी कोणती लक्षणे आहेत कि ज्यामुळे यांना आपण सस्तन प्राणी म्हणतो. स्तनांचा आढळ या गटातील सर्व प्राण्यांच्या मदिना स्तनाची निर्मिती झालेली असते. ज्याच्यातून दुध निघते व यांची पिल्ले लहान असताना त्यांच्या आईचे दुध पिऊनच त्यांचे पालन पोषण होत असते. केसधारी असणे या समूहातील सर्व प्राणी ही केसधारी असतात. थंडी, वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी केसांचा उपयोग होतो तसेच काही प्रमाणात पावसापासुन्ही त्यामुळे त्यांचे रक्षण होते. पिल्लांना जन्म देणे सस्तन प्राणी हे पिलांना जन्म देतात. ते अंडे घालत नाहीत. नियततापी यांच्या शरीराचे तापमान सर्व मोसमात सारखेच असते. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यामुळे सस्तन प्राणी सर्व तापमानात सक्रीय राहतात. परंतु यासाठी त्यांना आधील उर्जेची गरज असते, जे ते अधिक भोजन करून मिळवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या दातांची रचना असणे सस्तन प्राण्यांमध्ये विविध प्रकारच्या दातांची रचना असते.जे त्यांच्या खाण्याच्या सवयीनुसार, गरजेनुसार झालेली असते. जसे कि साप, मासे इ. प्राण्यांमध्येही दात असतात परंतु त्यांची रचना एकसारखीच असते. तसेच यांचे दात एकदा पडले कि पुन्हा उगवतात. परंतु सस्तन प्राण्यांचे दात त्यांच्या जीवनकाळात फक्त दोनदाच उगवतात. वरील सर्व सातन प्राण्यांची सामान्य लक्षणे सांगितली आहेत, परंतु याला काही अपवादही आहेत. अनुवाद - निलिमा जोरवर स्रोत- स्तनधारी परिचय पुस्तिका पर्यावरण शिक्षण केंद्र, अहमदाबाद