प्रस्तावना आपल्या पीसी उर्फ संगणकातून अथवा लॅपटॉपमधून निघणारे रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग किती धोकादायक असतो ह्याची आपणांस कल्पना आहे का? अभ्यासांमधून असे दिसले आहे की संगणक तसेच त्यासोबत वापरल्या जाणार्याा इतर उपकरणांमधून – उदा. प्रिंटर, मोडेम, वाय-फाय इ. – निघणार्याॉ विद्युतचुंबकीय उत्सर्जनामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते, झोपेच्या तक्रारी आणि वावड्यापासून थेट हृदयरोगापर्यंत. उदाहरणार्थ एखाद्या जुन्या, सीआरटी प्रकारच्या मॉनिटरच्या पुढील (पडद्याच्या) बाजूने 30 सेंमी अंतरात 3 मिलिगॉस् तर दोन्ही बाजूंकडून 4 मिलिगॉस रेडिएशन बाहेर टाकले जाते. संगणकामधून निघणार्याे ह्या धोकादायक रेडिएशनपासून दूर राहण्याचे सहा मार्ग आहेत ते असे -. आपल्याकडील जुना PC शक्यतितक्या लवकर काढून टाका, विशेषतः त्याचा मॉनिटर सीआरटी प्रकारचा असल्यास. अभ्यासांमधून असे दिसले आहे की कॅथोड रे ट्यूब (सीआरटी) प्रकराच्या ह्या जुन्या मॉनिटर्समधून मोठ्या प्रमाणात रेडिएशन सोडले जाते.त्यामानाने एलसीडी मॉनिटर्सचे उत्सर्जन कमी असते. अभ्यासांमधून असे दिसले आहे की एलसीडी प्रकारच्या पडद्यांद्वारे, पुढील अथवा मागील दिशांनी, 30 सेंमी अंतरात 0.3 मिलिगॉस् EMF सोडले जाते तर बाजूंकडून जवळजवळ नाहीच. तसेच जुन्या संगणकांमधून, नव्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक संगणकांच्या तुलनेने, दुप्पट रेडिएशन सोडले जाते. संगणकाच्या पडद्यासमोर रेडिएशन फिल्टर बसवल्यानेही त्याचा प्रभाव कमी होतो. तसेच आपल्या पीसीजवळ धातूच्या वस्तू ठेवू नका कारण त्यांमुळे विद्युतचुंबकीय लहरींचे परावर्तन होते. आपल्या संगणकाच्या पडद्यावरील चित्राची तेजस्विता (ब्राइटनेस) सोयीस्कर तितकीच ठेवा. अभ्यासांमधून असे दिसले आहे की पडदा जेवढा तेजस्वी असेल तेवढा किरणोत्सर्ग जास्त होतो व जेवढा कमी तेवढा कमी. अर्थात पडद्याची तेजस्विता डोळ्यांना त्रास होईल इतकी मंददेखील ठेवू नका! पडद्यापासून सुमारे 50 ते 75 सेंमी अंतरावर बसून काम करा. पीसीमधून निघणारे घातक उत्सर्जन टाळण्यासाठी मुळात पीसी योग्य ठिकाणी ठेवा. लोकांच्या उठण्याबसण्याच्या जागेजवळ पीसीची पाठ नसावी. कारण अभ्यासांमधून असे दिसले आहे की संगणकाच्या मागील बाजूने जास्त प्रमाणात रेडिएशन होते. आता ह्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही परंतु हे आढळले आहे खरे – कॅक्टस प्रजातीची म्हणजे निवडुंगासारखी झाडे रेडिएशन शोषून घेऊ शकतात. तेव्हा आपल्या कामाच्या ठिकाणी एखादे कॅक्टस ठेवल्याने रेडिएशनचा धोका कमी करता येईल. संगणकाच्या पडद्यातून कर्करोगजन्य पदार्थ बाहेर टाकले जातात व ते आपल्या आरोग्यास फार घातक असतात. खोलीतील वायुवीजन योग्य असल्यास त्यांपासूनचा धोका कमी करता येतो. संगणकाजवळ पंखा किंवा कूलर लावल्यानेही फरक पडू शकेल. तसेच वारंवार चेहरा धुण्याने त्वचेवरील कणरूपी रेडिएशन चक्क काढून टाकता येते, अगदी 70% पर्यंत! स्त्रोत: http://timesofindia.indiatimes.com