उन्हाळ्याला तोंड देण्याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय

भरपूर पाणी प्या. बाटलीबंद पाणी पिणे टाळा कारण त्याच्यात चव असली तरी त्या पाण्यामधील नैसर्गिक पोषणमूल्ये नष्ट झालेली असतात.

कॅफिनयुक्त पेये पिणे टाळा. ताकासारखे नैसर्गिक थंड पेय घ्या.

फिकट रंगाचे विशेषत: सुती कपडे घाला.

शरीरात पाण्याची कमतरता (डीहायड्रेशन) होऊ नये म्हणून पुष्कळ द्रव पदार्थ प्या. लिंबाचा रस, शहाळी, फळांचे रस इत्यादि नैसर्गिक द्रवपदार्थ आहेत. शहाळ्याच्या पाण्यात शर्करा, तंतुयुक्त पदार्थ (फायबर), व्हिटॅमिन (जीवनसत्त्व) व मिनरल्स (खनिजे) प्रमाणेच प्रथिने देखील असतात.

भरपूर सॅलड आणि ज्यामध्ये नैसर्गिक स्वरूपात पाणी असते अशी ताजी फळे खा उदा. टरबुज. वास्तविक पाहतां ह्या फळामध्ये सुमारे 92% पाणी व 14% व्हिटॅमिन सी असते. घामाच्या स्वरूपात शरीरातून कमी होणार्या आर्द्रतेच्या घटकांचे प्रमाण टिकविण्यासाठी ह्याची मदत होते. तसेच ह्या फळामध्ये थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी (ब जीवनसत्त्व) आणि पोटॅशियम देखील आढळतात.

मातीच्या भांड्यांमध्ये (माठात) साठवलेले पाणी प्या.

तेलकट पदार्थ खाऊ नका/खाणे टाळा आणि विशेषत: फळ-विक्रेत्यांकडे मिळणारी चिरून-कापून ठेवलेली फळे खाऊ नका कारण अशा फळांवर माश्या आणि घूळ-माती बसलेली असतातच.

हातपंखा जवळ बाळगा. वीज गेलेली असली तरी हा पंखा कामी येतो.

एखाद्या उघड्या असलेल्या खिडकीवर वाळ्याचा पडदा लोंबत सोडा. ह्याच्यामुळे घरामध्ये थंड वारे खेळते राहील (चांगले वायुवीजन होईल).