दिवे लावणे गरज नसताना अथवा वापर नसताना दिवे बंद ठेवा. ट्यूबलाइट्स, दिवे व त्यांच्या फिक्स्चर्सवर जमलेली धूळ वारंवार साफ करा. विजेची ISI प्रमाणित साधने व उपकरणे वापरा. ट्यूबलाइट्स व दिवे अशा जागी बसवा की त्यांपासून मिळणारा प्रकाश मध्ये कोठेही अडणार नाही. ऊर्जा बचतीसाठी सीएफ्एलचा वापर करा. सीएफ्एलच का? कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे जुन्या पद्धतीच्या पिवळ्या दिव्यांच्या तुलनेमध्ये फक्त 1/3 ऊर्जा वापरूनदेखूल तेवढाच प्रकाश देतात. अशारीतीने वीजवापर 75 टक्क्यांनी कमी होऊदेखील आपणांस पिवळ्या दिव्याप्रमाणेच सौम्य व मृदु प्रकाश मिळतो. सीएफ्एलची किंमत पहिल्यांदा जास्त वाटली तरीही त्यांमध्ये पैसे गुंतवणे अखेर फायदेशीर ठरते कारण ते आकाराने छोटे असतात, त्यांचा प्रकाश तेजस्वी व अधिक चांगल्या रंगाचा असतो. साधारणतः 90 अथवा 100 वॅटच्या जुन्या पद्धतीच्या दिव्याच्या जागी आपण 23 वॅटचा सीएफ्एल बसवू शकता. ज्याठिकाणचे दिवे साधारणपणे दरदिवशी 4 तासांपेक्षा अधिक काळ सुरू असतात अशा जागी सीएफ्एलचा वापर करा. दरदिवशी 4 तासांपेक्षा जास्त काळ चालणारे 75 वॅटचे दोन जरी जुने दिवे बदलून आपण त्याजागी प्रत्येकी 15 वॅटचे सीएफ्एल बसवल्यास दरवर्षी 18 किलोवॅट-तासांची बचत होऊ शकते.