तळेगाव हे गाव वर्धेपासुन ३० कि.मि. अंतरावर असुन आर्वी – वर्धा रोड्वर वसलेले आहे.या गावात एकुण कुटुंबे असुन 2000 लोकसंख्या आहे.येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व दुग्धव्यवसाय आहे.हे गाव आर्वी – वर्धा रोड्वर असले तरि गावाचा संपुर्न भाग जंगलांनी वेडलेला आहे.त्यामुळे जंगलामध्ये रान डुक्कर व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

येथील शेतकरी शेतात बी टाकल्यापसुन ते उत्पन्न घरि येईपर्यंत त्यांना शेतात जागल करावी लागते. अन्यथा त्यांनी पेरलेल्या बीयांण्यांचा खर्च सुध्दा निघत नाहि.शेतकर्यांना पावसाळ्यात पावासामधे व हीवाळ्यात थंडीमध्ये शेतात राहावे लागते. व त्यांची रात्रीला झोप होत नाही कारण त्यांना रात्रभर जागरण करावे लागते त्यामुळे त्यांची प्रकृती खालावते तसेच रात्रभर जागुन सुध्दा जंगली जनावरे पिक खातात व संपुर्ण पिक शेतकर्यांच्या घरी येत नाही.त्यामुळे त्यांची आर्थीक परिस्थीती खालावली. व शेतकर्यांना शेती परवडेनाशी झाली. शेतकरी जंगलकाठावरील शेती पडीत ठेवु लागले व जंगली जनावरांचा वावर गावांकडे होवु लागला. शेतकरी गावाजवळील शेतीसुध्दा पडीत ठेवु लागले. त्यांची आर्थीक परीस्थीती खाल्यावल्याने त्यांचेवर कर्जाचा बोझा वाढ्त राहीला.मुलांना चांगले शिक्षण देवु शकले नाही,मुलांच्या व कुटुंबाच्या गरजा पुर्ण करु शकले नाही.त्यामुळे त्यांचे मानसीक संतुलन बिघड्ले.

त्यांनी हार न मानता जंगली जनावरांना रोकण्याकरीता सतत प्रयत्न करीत राहीले परंतु त्यांना परिपुर्ण यश आले नाही.तरीपण ते जनावरांना रोकण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना मार्ग सापड्ला.

ती म्ह्णजे कमी खर्चाची सौर बॅटरी !

सौर बॅटरी मुळे मिळाले शेतकर्यांना जिवदन !

शेतकरी जंगली जनावरांना रोकण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना सौर बॅटरी विषयी कळले, काही लोकांनी त्याविषयी माहीती काढली व नंतर त्या शेतकर्यांनी सौर बॅटरी त्यांचे शेतामध्ये लावुन पाहीली त्यांचा चांगला फायदा झाला, त्यांचे पाहुन इतर शेतकर्यांनी सौर बॅटरी लावले व पाह्ता पाह्ता गावातील ७० % शेतकर्यांनी आपआपल्या शेतात सौर बॅटरी लावली. ती पण कमी खर्चात.

सौर बॅटरी मुळे शेतकर्यांना झालेला फायदा

शेतकर्यांना रखवालीपासुन मुक्तता,

जंगली जनावरांनपासुन मुक्तता,

शेतीतील पुर्ण पिक घरी येवु लागले,

मजुरांना काम मिळु लागले,

शेतकर्यांच्या आरोग्यात सुधारणा होवु लागली,

आर्थीक परिस्थीतित सुधारणा होवु लागली.

मुलांचे शिक्षण व इतर आवश्यक गरजा पुर्ण होवु लागल्या.

शेतकर्यांना शेती करन्यात आवड निर्माण होवु लागलि.

सौर बॅटरी करीता होणारा खर्च -( 5 एकर करीता )

बॅटरी - ७५०० /-

सौर पॅनल ४००० /-

तार ६० किलो ३६०० /- ( गरजेनुसार )

एकुण खर्च १५१०० /-( अक्षरी पंधरा हजार शंभर रुपये फक्त )
आशय लेखक : सचिन डोंगरे (खरांगणा)