सौर कंदील सौरऊर्जेचा 'फोटोव्होल्टाइक' तंत्राद्वारे वापर करून प्रकाश उत्पन्न करण्याचा सरळसाधा मार्ग म्हणजे सौर-कंदील. ग्रामीण भागात वीजपुरवठा बेभरवशाचा व कमीच असल्याने तेथे सौर-कंदील लोकप्रिय आहेत. शिवाय मोठ्या शहरांमध्येही भारनियमन होत असल्याने हे साधन वापरले जाते कारण, हे तांत्रिक दृष्टीनेही किचकट नाही. सौर कंदिलाचे काम कसे चालते ? सौर-कंदिलाचे तीन मुख्य घटक असतात – फोटोव्होल्टाइक उर्फ पीव्ही पॅनेल, बॅटरी आणि दिवा. ह्याचे काम अगदी साध्या पद्धतीने चालते. सौरऊर्जेचे रूपांतर, पीव्ही पॅनेलद्वारे, विद्युतऊर्जेत केले जाते व ही वीज एका देखभालमुक्त सीलबंद बॅटरीत साठवली जाते. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ती सुमारे चार-पाच तास चालते. स्रोत: www.geda.org.in