उर्जा आणि स्वावलंबन हे सचित्र अनुवादीत पुस्तक आहे अनुवाद : अ. पां. देशपांडे प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे पुस्तकाविषयी मानव जातीच्या अस्तित्वाला धोक्याची जाणीव करून देण्यासाठी योना फ्रेंडमां यांनी “उर्जा आणि स्वावलंबन” प्रस्तुतचे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तुतच्या पुस्तकात पुढील गोष्टींचा सचित्र समावेश आहे उर्जा म्हणजे काय? उर्जेची निर्मिती आणि वापर उर्जेचे स्त्रोत तुमच्या जवळचे उर्जा स्त्रोत मनुष्य उर्जा कशी वापरतो यंत्रामुळे उर्जेची उपयुक्तता वाढते उर्जा स्त्रोतांचे व्यवस्थापन जैविक वायूची निर्मिती आणि वापर सौर उर्जेवर स्वयपाक पवनउर्जा तुमच्या सेवेत हवेकडून काम करून घ्या स्वयंपाकासाठी लागणारी उर्जा मिळवा इंधन बचत करणारी चूल उर्जा आणि स्वावलंबन हि एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. उर्जा आणि परिसर, ग्राम विकास, प्रौढ शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, अशा कार्यात गुंतलेल्या सामाजिक संस्थांना आणि कार्यकर्त्यांना या पुस्तिकेचा उपयोग आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यातून काही प्रकल्प विकसित करता येतील पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा स्त्रोत : अरविंद गुप्ता टॉइज