वीज सेवेसंदर्भातील कायदेशीर तरतुदी हक्क व प्रक्रिया याविषयी, प्रयास उर्जा गट, पुणे यांनी प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका. आजच्या युगामध्ये विजेची आवश्यक ता निर्विवाद असूनही ती पुरवणार्या व्यवस्थेची, त्याबाबत असणारे कायदेकानून, नियम, हक्क वगैरेंची सर्व सामान्य ग्राहकास फारशी माहिती नसते. तसेच वीज कं पनीच्या दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीबद्दल देखील स्पष्ट ता नसते. अनेक प्रश्न समोर येत असतात. नवीन वीज जोडणीचा अर्ज कुठे मिळतो? नवीन जोडणीसाठी नक्की किती पैसे पडतात? मीटर जळाल्यास किंवा बंद पडल्यास काय करावे? अचानक पणे जास्त आलेले वीज बील भरावे की नाही? तक्रार कोठे नोंदवावी? तिचे निवारण कशा पद्धतीने होते? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ग्राहकाला माहीत नसल्याने बर्याचदा तो चक्रावूनच जातो. यातच भर पडते ती सरकारी कारभारामधील गलथानपणाची आणि भ्रष्टाचाराची. अशा वेळी ग्राहकांना वीज सेवेसंबंधी असलेले अधिकार, नियम आणि हक्क समजावून सांगू शकेल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयोगी पडेल अशी छोटी पुस्तिका हाताशी असेल तर नक्कीच उपयोग होईल. प्रकरण १ : पार्श्वभूमी प्रकरण २ : विजेची नवीन जोडणी प्रकरण ३ : नावातील बदल प्रकरण ४ : मीटर प्रकरण ५ : विजेचं बील प्रकरण ६ : सुरक्षा अनामत प्रकरण ७ : वीज पुरवठ्याची गुणवत्ता प्रकरण ८ : ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण प्रकरण ९ : अनाधिकृत वीज वापर व वीज चोरी प्रकरण १० : ग्राहकांची जबाबदारी प्रकरण ११ : समारोप परिशिष्टे १. वीज पुरवठा मागणी अर्ज २. घरगुती वीज वापरातील विजेची उपक रणे व त्यांचा वीज वापर ३. अंतर्गत वायरिंगचा रिपोर्ट ४. नावातील बदलासाठी आवश्यक अर्जांचा नमुना ५. वारसाहक्कानुसार नावातील बदलासाठीचा आवश्यक अर्जाचा नमुना ६. अंतर्गत गार्हाणे निवारण यंत्रणा कक्षाकडे करावयाचा अर्जाचा नमुना ७. ग्राहक निवारण मंचाकडे करावयाचा अर्जाचा नमुना ८. विद्युत लोकपालाकडे करावयाच्या अभिवेदनाचा नमुना ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाचे अधिनियम, विनियम व आदेश प्रकाशक : प्रयास, प्रयास उर्जा गट, पुणे स्त्रोत : prayaspune.org (पूर्ण पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा )